seva nivrutti invitation card in marathi | Retirement invitation card | seva nivrutti banner editing PLP | सेवा निवृत्ती समारंभ निमंत्रण पत्रिका
सेवानिवृत्ती समारंभ हा त्यांच्या करिअर किंवा व्यवसायातून निवृत्त होणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. सेवानिवृत्ती म्हणजे ज्या कालावधीत एखादी व्यक्ती त्यांच्या नोकरी किंवा व्यवसायातून कायमस्वरूपी माघार घेण्याचे ठरवते. हे सामान्यत: एखाद्या व्यक्तीच्या करिअरच्या समाप्तीशी संबंधित असते. सेवानिवृत्ती अनेकदा ठराविक वयानंतर किंवा विशिष्ट निकष पूर्ण केल्यानंतर घेतली, जसे की सेवानिवृत्तीच्या ठराविक वर्षांपर्यंत पोहोचणे किंवा वैयक्तिक सेवानिवृत्ती घेणे.
सेवा निवृत्ती हा एखाद्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आणि समर्पणानंतर, चिंतन करण्याची, सिद्धी साजरी करण्याची आणि प्रेमळ अध्यायाला निरोप देण्याची ही वेळ आहे. सेवानिवृत्ती समारंभ हा निवृत्त व्यक्तीचा सन्मान करण्याचा आणि व्यक्ती आणि संपूर्ण समुदायासाठी कायमस्वरूपी आठवणी निर्माण करण्याचा एक उत्कृष्ट असा समारोह आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये सेवानिवृत्ती समारंभा साठी लागणारे सेवा निवृत्ती निमंत्रण कार्ड कसे बनवायचे ते पहाणार आहोत, जे की तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने बनवुन तुमच्या जवळील मित्र व परिवार यांस सोशल मीडिया द्वारे पाठवु शकता.
Retirement Invitation card in Marathi
सामान्यतः, सेवानिवृत्ती समारंभात सहकर्मी, पर्यवेक्षक किंवा मित्रांद्वारे भाषणे किंवा सत्कार समारंभ समाविष्ट असते जे त्यांच्या जिवनातील किस्से, कृतज्ञता व्यक्त करतात आणि सेवानिवृत्त व्यक्तीला भेटवस्तू, पुरस्कार किंवा त्यांच्या सेवेच्या वेळेचे प्रतिनिधित्व करणारी प्रतीकात्मक वस्तू देखील दिली जाऊ शकते. सेवानिवृत्त व्यक्तीसाठी निरोपाचे भाषण देणे, त्यांच्या कारकिर्दीबद्दलचे प्रतिबिंब शेअर करणे आणि त्यांच्या व्यावसायिक प्रवासात ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांचे कौतुक करणे.
या समारंभाचा उद्देश सेवानिवृत्त व्यक्तींच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाची प्रशंसा करणे आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देणे.
खाली दिलेले काही पॉईंट एका नोटपॅड मध्ये टाईप करून ठेवु शकता.
● स्थळ निवडणे: सेवानिवृत्त व्यक्तीचा समारंभासाठी आकर्षक असे ठिकाण किंवा एक बँक्वेट हॉल, एक सुंदर बाग किंवा त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये एक आरामदायक संमेलन करु शकता.
● वेळ व तारीख निश्चित करणे: समारंभ ची वेळ व तारीख ठरवणे, किंवा एखाद्या शुभमुहूर्तावर दिनांक व वेळ निश्चित करणे.
● आमंत्रणे: सहकारी, मित्र आणि कुटुंबीयांना वैयक्तिकृत आमंत्रणे पाठवा, सेवानिवृत्ती समारंभाबद्दल सर्व आवश्यक बाबी प्रदान करा. सेवानिवृत्त व्यक्तींशी विशेष संबंध असलेल्या प्रमुख व्यक्तींना मनापासून संदेश समाविष्ट करा.
Retirement invitation card Download
खाली दिसत असलेले डिझाईन सेवा निवृत्ती समारंभ निमंत्रण पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला त्या डिझाईनच्या खाली डाऊनलोड बटन दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही फाईल डाऊनलोड करून घ्यायची आहे.
Zip file mobile मध्ये सेव झाल्यावर त्या फाईलला Extract करायचे आहे. त्या मधील seva nivrutti invitation card PLP file Pixellab app मध्ये एड करायची आहे, त्या साठी खालील प्रोसेस फॉलो करा.
Seva Nivrutti Banner Editing PLP file
Pixellab app mobile मध्ये installed केल्या नंतर त्या मध्ये PLP file add करायची आहे, त्या साठी तुम्ही ही प्रोसेस फॉलो करु शकता. How to add PLP file in Pixellab किंवा खालील व्हिडिओ पाहु शकता.
PLP फाईल add झाल्यावर ती तुम्ही सोप्या पद्धतीने ईडीटींग करु शकता, तर या मध्ये सर्व टेक्स्ट तुम्ही हवे तसे ईडीटींग करु शकता, जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करायचा आहे, त्यानंतर A च्या ऑप्शन वर येऊन एडिट वर क्लिक करून तुमचा जो टेक्स्ट असेल तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे, त्यानंतर ओके वर क्लिक करायचं आहे.
तर यामध्ये जेवढेही टेक्स्ट दिसत असेल तुम्ही अशाच प्रकारे एडिटिंग करून घेऊ शकता, जर तुम्हाला त्या टेक्स्ट चा कलर चेंज करायचा असेल तर तो कलर सुद्धा तुम्ही चेंज करू शकता, त्या Text वर क्लिक करून A याचे ऑप्शन वर येऊन तुम्हाला कलरचे ऑप्शन वर क्लिक करायचं आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर चेंज करून घेऊ शकता.
फोटो ॲड करण्याची सर्व प्रथम फोटो तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा आहे, निमंत्रण पत्रिका डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोटो क्रॉप करून घेऊ शकता, फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला ॲप मध्ये वरीती + चिन्हा वर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचा आहे, तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये तुम्ही तिथे फोटो सेव करून ठेवलेला आहे, तिथून तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि बॅनर डिझाईन निमंत्रण पत्रिकेमध्ये दाखवल्याप्रमाणे फोटो ऍडजेस्ट करून घेऊ शकता.
सेवा निवृत्ती निमंत्रण पत्रिका पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ती सेव करायचे आहे, तर त्यासाठी वरती तुम्हाला सेव चे ऑप्शन वर क्लिक करून सेव टू गॅलरी वर क्लिक करायचं आहे.
जर यामधील कोणतेही स्टेप्स समजली नसेल तर याचे आपण व्हिडिओ आपल्या youtube चॅनेल वर अपलोड केलेले आहे तेथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता व तशाप्रकारे स्टेप्स फॉलो करून तुमची seva nivrutti invitation card in marathi निमंत्रण पत्रिका बनवू शकता.
तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment