Pratham Punyasmaran Banner PLP | varsha shraddha banner editing | प्रथम पुण्यस्मरण बॅनर मराठी

 Pratham Punyasmaran Banner PLP | varsha shraddha banner editing | प्रथम पुण्यस्मरण बॅनर मराठी

प्रथम पुण्यस्मरण हिंदू धर्मातील पहिल्या पुण्यतिथीला केला जातो. एखाद्या दिवंगत प्रिय व्यक्तीला स्मरण आणि श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. या वेळी, कुटुंब आणि मित्र मृत व्यक्तीचे जीवन आणि यशाचे स्मरण करण्यासाठी एकत्र येतात आणि त्यांच्या चिरंतन शांतीसाठी प्रार्थना करतात. त्याच निमित्ताने आपण या मध्ये प्रथम पुण्यस्मरण निमंत्रण पत्रिका कशी बनवायची ते पहाणार आहोत, या बॅनर डिझाईन द्वारे तुम्ही तुमच्या जवळील लोकांना निमंत्रण देऊ शकता. तसेच या मध्ये तुम्ही दिनांक वेळ व कार्यक्रम रुपरेषा ही टाकु शकता.

Pratham Punyasmaran PLP file Download

प्रथम पुण्यतिथी दरम्यान केले जाणारे विधी आणि चालीरीती प्रादेशिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारे बदलू शकतात.  तथापि, काही सामान्य पद्धतींमध्ये हे समाविष्ट आहे. कुटुंब श्राद्ध समारंभ आयोजित करते, जो मृत आत्म्याला शांती करण्यासाठी हिंदू विधी आहे.  यात सामान्यत: प्रार्थना करणे, पवित्र विधी करणे आणि पूर्वजांना अर्पण करणे यांचा समावेश होतो. या दिवशी प्रवचन किर्तन तसेच अन्य कार्यक्रम ही ठेवले जातात.

असे मानले जाते की पाणी अर्पण केल्याने त्यांची आध्यात्मिक तहान भागते आणि त्यांना आशीर्वाद मिळतात. पिंडा दान हा एक विधी आहे ज्यामध्ये मृत आत्म्याला तांदळाचे गोळे किंवा पिंडा अर्पण केला जातो. असे मानले जाते की हा विधी केल्याने आत्म्याला शांती आणि मुक्ती मिळते. अनेक कुटुंबे मृत आत्म्याचा सन्मान करण्यासाठी गरजूंना अन्न, कपडे किंवा पैसे दान करणे निवडतात.  हे कृत्य मृत व्यक्तीसाठी सकारात्मक कर्म निर्माण करते असे मानले जाते.

 प्रथम पुण्यतिथी कुटुंब आणि मित्रांना एकत्र येण्याची, त्यांच्या आठवणी सांगण्याची, त्यांचे दु:ख व्यक्त करण्याची आणि सामूहिक पाठिंब्यामध्ये आधार देते. मृत व्यक्तीच्या जीवनावर आणि शिकवणींवर चिंतन करण्याची आणि या पृथ्वीवरील क्षेत्राच्या पलीकडे त्यांच्या आध्यात्मिक प्रवासासाठी प्रार्थना करण्याची ही वेळ आहे.

Pratham Punyasmaran PLP file Download


या आधी सुध्दा तुम्हाला अशाच प्रकारची प्रथम पुण्यस्मरण बॅनर डिझाईन बनवलेली आहे, तर या मध्ये सुध्दा तुम्हाला आपण दोन वेगवेगळ्या वर्षेश्राद्ध निमंत्रण पत्रिका दिलेल्या आहेत, त्या पैकी तुम्ही कोणतीही एक बॅनर डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये सेव करुन घ्यायची आहे, फाईल ईडीटींग करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला ती फाईल डाऊनलोड करायची त्या साठी तुम्हाला जी बॅनर डिझाईन बनवायची आहे त्या डिझाईन च्या खाली दिलेल्या बटन वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर परत एक नवीन पेज ओपन होईल त्या मध्ये तुम्ही ती फाईल भेटुन जाईल. फाईल सेव केल्या नंतर त्या फाईलला Extract करायचे आहे. त्या मधील Pratham Punyasmaran PLP File Pixellab app मध्ये एड करायची आहे.


Pratham Punyasmaran Banner Editing

Pratham Punyasmaran Banner 02

प्रेम देऊनी जगाला जवळ केले सर्वांना,

न उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला,

कल्पनेतही नव्हते तुमचे जाणे, अधुरे राहिले जीवन गाणे,

आता फक्त एकच उरले तुमच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहणे,

तुमच्या स्मृतींना आमची भावपूर्ण आदरांजली.




Pratham Punyasmaran Banner Editing


प्रथम पुण्यस्मरण बॅनर डिझाईन ईडीटींग करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app installed करुन घ्यायचे आहे, त्या मध्ये तुम्ही zip file Extract केलेल्या फोल्डर मधील Pratham Punyasmaran PLP File add करायची आहे, त्या साठी तुम्ही How to add PLP in Pixellab हा ब्लॉग पाहु शकता किंवा व्हिडिओ ट्युटोरियल पाहु शकता.


बॅनर डिझाईन मध्ये दिसत असलेले जे टेक्स्ट असतील ते तुम्ही तुमच्या पद्धतीने एडिटिंग करून घेऊ शकतात, जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करून A च्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे, त्यानंतर एडीट वर क्लिक करून तुमचा जो टेक्स्ट असेल तो तुम्हाला टाईप करून ओके करा.


फोटो एड करण्यासाठी एप मध्ये वरील + चिन्हा वर क्लिक करा त्या नंतर तुमच्या मोबाईल गॅलरी मधील फोटो सिलेक्ट करा. आणि फ्रेम मध्ये सेट करा, फोटो वर क्लिक करा ईटीट ऑप्शन वर येऊन  फोटोला टु बॅक करा, जेणेकरून एड केलेला फोटो फ्रेमच्या मागे जाईल.



Pratham Punyasmaran Banner

Pratham Punyasmaran Banner 03

प्रथम पुण्यस्मरण बॅनर डिझाईन ईडीटींग करुन झाल्यावर सेव करण्यासाठी वर दिलेल्या सेव बटन वर क्लिक करा आणि क्वालिटी अल्ट्रा करुन Save To Gallery करायचे आहे, जेणेकरून तुम्ही बनवलेली बॅनर डिझाईन तुमच्या गॅलरी मध्ये सेव झालेली असेल.

 

तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता. 


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.



Post a Comment

Previous Post Next Post