Dhulivandan banner PLP | Dhulivandan Shubhechha photo | Dhulivandan banner Editing | Holi banner | Dhulivandan 2023 | धुलीवंदन बॅनर डिझाईन | धुलीवंदन शुभेच्छा

 Dhulivandan banner PLP | Dhulivandan Shubhechha photo | Dhulivandan banner Editing | Holi banner | Dhulivandan 2023 | धुलीवंदन बॅनर डिझाईन | धुलीवंदन शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर या आधी सुद्धा आपण होळीच्या निमित्ताने ब्लॉग बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला होळी पौर्णिमा शुभेच्छा फोटो दिलेले आहेत, तर त्याच निमित्ताने यामध्ये आपण जो दुसऱ्या दिवशी सण येतो तो धुलीवंदन त्या निमित्ताने तुम्हाला ह्यामध्ये आपण आज तशाच प्रकारच्या शुभेच्छुक फोटो दिलेले आहेत, जे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करून सोप्या पद्धतीने एडिटिंग करून घेऊ शकता. 


Dhulivandan banner editing PLP

होळी हा एक उत्साही आणि रंगीबेरंगी सण आहे, जो दरवर्षी भारतात आणि जगाच्या इतर भागात साजरा केला जातो. याला "रंगांचा सण" धुलीवंदन किंवा "प्रेमाचा सण" म्हणून देखील ओळखले जाते, आणि फाल्गुनच्या हिंदू महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, जो सामान्यत फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येतो. होळी हा लोकांसाठी एकत्र येण्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय, वसंत ऋतूचे आगमन आणि मैत्री आणि कौटुंबिक संबंधांचे नाते घट करण्याची वेळ आहे.


Dhulivandan Shubhechha banner


धुलीवंदन हा सण केवळ रंग खेळण्याचा नसून प्रेम, आनंद आणि आनंद पसरवणारा आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा लोक आपले मतभेद विसरून एकत्र येतात आणि एकता आणि बंधुत्वाची भावना साजरी करतात. होळी ही क्षमा करण्याचा एक प्रसंग आहे, कारण लोक त्यांच्या प्रियजनांकडून क्षमा मागतात आणि ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे त्यांना क्षमा करतात.


होळी हा मौजमजेचा सण असला तरी त्यामागील संस्कृती आणि परंपरा यांचा आदर करून तो साजरा करणे महत्त्वाचे आहे. उत्सवादरम्यान पर्यावरणपूरक रंग वापरणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन लोकांनीही सण सुरक्षित आणि जबाबदारीने साजरा केला पाहिजे.


होळी हा एक रंगीबेरंगी आणि आनंदाचा सण आहे जो लोकांना प्रेम, मैत्री आणि वसंत ऋतूचे आगमन साजरे करण्यासाठी एकत्र आणतो. द्वेष सोडून एकमेकांना क्षमा करण्याची, आनंद आणि सकारात्मकता पसरवण्याची आणि एकत्रतेच्या भावनेने आनंद घेण्याची ही वेळ आहे. आपण सर्वांनी हा सण आदराने, आनंदाने आणि शांततेने साजरा करूया. सर्वांना होळीच्या शुभेच्छा देऊ या. 

Dhulivandan Shubhechha photo
Dhulivandan banner PLP #1


Dhulivandan Banner Editing PLP file


यामध्ये तुम्हाला आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन दिलेल्या आहेत, त्याच्या ज्या dhulivandan PLP फाईल आहेत, त्या तुम्हाला सर्व बॅनर डिझाईन खाली दिलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या डाऊनलोड करून घ्यायचा आहेत, डाऊनलोड केल्यानंतर त्या फाईल ला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. केल्यानंतर त्यामध्ये जी पी एल पी फाईल आसेल ती तुम्हाला pixellab app मध्ये ऍड करून एडिटिंग करायची आहे.


Dhulivandan banner PLP file pixellab app मध्ये ऍड करण्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस आहे, तुम्हाला  ती फॉलो करायची आहे आणि जी पी एल पी फाईल आहे ती त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे. फाईल ॲड झाल्यानंतर ते तुम्हाला एडिटिंग करायचे आहे तर त्यामध्ये आपण जेवढेही टेक्स्ट दिलेले आहेत, जसे की शुभेच्छुक चा टेक्स्ट असेल तो तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता व त्यामध्ये तुमचा फोटो सुद्धा तुम्ही ऍड करून घेऊ शकता. 


त्यामध्ये टेक्स्ट एडिट करण्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे, त्यानंतर  A च्या ऑप्शन वर जाऊन एडिट वर क्लिक करून त्यामध्ये जो पहिला टेक्स्ट असेल तो डिलीट करून तुमचा नावाचा जो टाईप असेल तर तुम्ही टाईप करून घेऊन त्याला ओके करायचं आहे. 


फोटो ॲड करण्यासाठी त्या ॲप्लिकेशन मध्ये सर्वात वरती तुम्हाला + चे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे, नंतर त्यामध्ये फ्रॉम गॅलरी वर क्लिक करून तुमच्या गॅलरी मधील तुमचा क्रॉप केलेला फोटो सिलेक्ट करून बॅनर डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे ॲड करून सेट करून घ्यायचा आहे. 



धुलीवंदन बॅनर डिझाईन

Dhulivandan banner PLP #2


तर अशाप्रकारे तुम्ही तुमची स्वतःची शुभेच्छुक बॅनर डिझाईन येते एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता जर तुम्हाला यामध्ये काही अडचण येत असेल एडिटिंग करताना तर याचे आपण पूर्ण व्हिडिओ ट्युटोरियल येथे आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड केलेले आहे तेथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता. 


Watch Video Tutorial


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.


Post a Comment

Previous Post Next Post