Mangal parinay lagna patrika making | मंगल परीणय निमंत्रण पत्रिका मराठी | Buddhist wedding invitation card matter
Mangal parinay lagna patrika making | मंगल परीणय निमंत्रण पत्रिका मराठी | Buddhist wedding invitation card matter
नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये,
ह्या ब्लॉग मध्ये आपण एकदम नवीन पद्धतीने लग्न पत्रिका जी मंगल परिणय पत्रिका कशी बनवायची ते पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला आपण एक फाईल दिलेली आहे जी फाईल ऍप मध्ये ऍड करून तुम्ही तुमची जी काही मंगल परिणय लग्नपत्रिका आहे ती काही मिनिटात बनवू शकता.
मंगल परिणय पत्रिका कशी बनवायची त्याची पूर्ण स्टेप साहित्य मला खाली सांगितलेले आहेच त्याचबरोबर तुम्हाला काही आपलिकेशन ची सुद्धा गरज लागणार आहे व आपण जे पी एल पी पाहिलेले त्याची लिंक आहे तुम्हाला सर्वात खाली ती भेटून जाईल तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता.
मंगल परिणय पत्रिका ची तुम्हाला वर दिसत असलेली डिझाईन जी काय आपण बनवलेले आहे तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये लग्न पत्रिका आहे ती बनवू शकता त्यासाठी तुम्हाला काही ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे ते आपलिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जातील तर तिथे तुम्हाला भेटत नसेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा अपलोड केलेले आहेत तुम्हाला टेलिग्राम चॅनेल ची लिंक आहे ती खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तिथे जाऊन डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता.
Pixellab
Indian font converter
Mangal parinay lagna patrika PLP
पिक्सल लब अॅप ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे तुम्हाला पी एल पी फाईल दिलेले आहे ती ऍड करायची आहे ॲड करण्यासाठी तुम्हाला त्याची काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे तुम्हाला फॉलो करून घ्यायची आहे. Add pixellab PLP file.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती फाईल डाऊनलोड करायचे आहे. डाउनलोड केलेली फाईल तुम्हाला ती एक्सट्रॅक्ट करायचे आहे, Extract केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला mangal parinay lagna patrika plp फाईल दिलेली आहे ती फाईल त्या मध्ये ऍड केल्या नंतर ती एडिट करायची आहे.
यामध्ये आपण जे काही टेक्स्ट वापरले आहेत त्या टेक्स्टला आपण श्री लिपी फॉन्ट ऍड केलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला तो आधी फॉन्ट चा युनिकोड कन्वर्ट करून घ्यावा लागेल त्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज लागेल ते ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.
Indian font converter app ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपला जो फॉन्ट आहे तो श्री Shreelipi आहे त्यासाठी तुम्हाला त्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही टेक्स्ट असेल तो टेक्स्ट तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे टाईप केलेला टेक्स्ट कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्हाला खाली कन्वर्टर वर क्लिक करायचा आहे जेणेकरून तो तुमचा टेक्स्ट यूनिकोड कन्व्हर्टर होऊन जाईल यूनिकोड कन्व्हर्टर झालेला आहे. तुम्हाला कॉपी च्या ऑप्शन वर क्लिक करून कॉफी करुन द्यायचा आहे.
परत तुम्हाला पिक्सलब ओपन करायचं आहे, तुम्हाला जो टेक्स्ट एडिट करायचं आहे. त्याच्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिट च्या ऑप्शन वर क्लिक करून जो काही पहिला टेक्स्ट असेल तो टेक्स्ट डिलीट करायचा आहे, नंतर तिथं लॉंग प्रेस करून आत्ता जो कॉपी केलेला टेक्स्ट पेस्ट करायचे आहे. तर अशा तऱ्हेने तुमचे तो टेक्स्ट तो एडिट झालेला असेल.
यामध्ये जेवढेही टेक्स्ट दिलेले आहेत ते अशाच प्रकारे तुम्हाला एडिट करायचे आहेत जर तुम्हाला या टेक्स्ट चा फॉन्ट चेंज करायचा असेल तर तुम्ही फॉन्ट सुद्धा चेंज करू शकतात तसेच त्या टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल तर कलर सुद्धा चेंज करू शकता त्यासाठी तुम्हाला A च्या ऑप्शन वर येऊन तुम्हाला तिथे सर्व टूल्स दिसतील ते टूल्सचा वापर करून तुम्ही त्या टेक्स्ट चा कलर वर फॉन्ट तसेच text ची साईज सुद्धा कमी जास्त करू शकता.
अशा प्रकारचे तुमची सर्व जी काही mangal parinay lagna patrika एडिटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला ती सेव्ह करायची आहे. सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती सेव्ह ऑप्शन वर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर त्याची क्वालिटी एचडी पाहिजे असेल तर तिथं तुम्हाला अल्ट्रा अल्ट्रा क्वॉलिटी ठेवायची आहे आणि सेव टु गॅलरी करून घ्यायचे आहे. आता तुमची जी काही बनवलेले पत्रिका आहे ती तुमच्या गॅलरीमध्ये सेव झालेली असेल.
ह्या मधील जर तुम्हाला काही स्टेप्स समजली नसेल तर आपण याचे व्हिडिओ ट्यूटोरियल आपल्या YouTube channel वर दिलेले आहे. तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही याचे जे फुल ट्यूटोरियल आहे त्यामध्ये आपण तुम्हाला सविस्तर सर्व स्टेप-बाय-स्टेप संपूर्ण माहिती दिलेली आहे ती सुद्धा एकदम सोप्या पद्धतीत तर अशाच प्रकारच्या अजून सुद्धा आपल्या युट्युब चॅनेल वरती lagna patrika PLP file दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही त्या सुद्धा पाहू शकता तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवू शकता.
जर तुम्हाला एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला खाली इंस्टाग्राम आयडी दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेज वर आल्यानंतर तिथे फॉलो करून मेसेज करू शकता.
إرسال تعليق