Navratri Banner Editing | navratri banner editing plp file | Navratri banner images
भारतात शरद ऋतूच्या आगमनाने सर्वात उत्साही आणि आनंदाचा महत्त्वपूर्ण सण, नवरात्रीची सुरुवात होते. हा नऊ दिवसांचा उत्सव, देवी स्त्रीच्या उपासनेला समर्पित, देशभरात उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. रंगीबेरंगी सजावट, पारंपारिक नृत्य प्रकार आणि धार्मिक विधी, नवरात्री भक्ती, एकता आणि वाईटावर चांगल्याचा विजयचा समाविष्ट करते. तर त्याच निमित्तांने या मध्ये Navratri Utsav Banner Editing कशी करायची याची माहीती दिली आहे, खाली दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये नवरात्री बॅनर डिझाईन करून शुभेच्छा देऊ शकता.
Navratri Utsav Banner Editing Images
नवरात्री, म्हणजे संस्कृतमध्ये 'नऊ रात्री', दुर्गुणांवर सद्गुणाच्या विजयाचे प्रतीक आहे. हे देवी दुर्गेच्या विविध रूपांद्वारे दर्शविल्या जाणार्या दैवी स्त्री शक्तीचा सन्मान करते आणि आंतरिक शक्ती, शुद्धता आणि भक्ती यांचे महत्त्व अधोरेखित करते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवीच्या वेगवेगळ्या रूपांच्या पूजेशी संबंधित आहे. या उत्सवात भक्त उपवास करतात, विधी करतात आणि प्रार्थना करतात.
नवरात्री उत्साही सांस्कृतिक उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे, विशेषत गरबा आणि रास दांडिया या पारंपरिक नृत्य प्रकारासाठी. लोक पारंपारिक पोशाख परिधान करतात, आणि या उत्साही नृत्य प्रकारांमध्ये भाग घेतात, आनंद आणि एकता व्यक्त करतात. गाण्याच्या तालबद्ध ताल आणि पारंपारिक गाण्यांचे मधुर सूर संसर्गजन्य उत्साह आणि भक्तीने भरलेले वातावरण निर्माण करतात. नवरात्रीत दुर्गा देवीच्या सुंदर सुशोभित मूर्ती, मंदिरे आणि घरे प्रकाशित होतात.
Navratri Utsav banner editing PLP file
सर्वप्रथम यामध्ये दिलेले तुम्हाला Navratri Utsav Banner PLP file फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आहे. ती तुम्हाला त्या बॅनर डिझाईन च्या खाली दिलेली आहे, त्यानंतर Pixellab app open करून त्यामध्ये तुम्हाला ती फाईल ॲड करायची आहे त्यासाठी तुम्ही हा How to add PLP file ब्लॉग सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ सुद्धा पाहू शकता.
Navratri Utsav Banner PLP File ऍड करुन झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला शुभेच्छुक चा टेक्स्ट दिसत असले तो टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता, त्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करून A ऑप्शनवरून एडिट वर क्लिक करायचा आणि तुमच्या नावाचा टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे.
फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी वर दिसत असलेल्या + प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, आणि तुमचा गॅलरी मधील क्रॉप केलेला फोटो तुम्ही डिझाईन मध्ये दाखल्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता.
तर अशाप्रकारे नवरात्री उत्सव बॅनर डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर ते तुम्हाला सेव्ह करायचे आहे, तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती सेव च बटन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, आणि कॉलिटी अल्ट्रा देऊन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन येते तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात तसेच शुभेच्छा देऊ शकता.
तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये अशाच आपण खूप सार्या पोस्ट सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत, त्याच्या जे काही तुम्हाला टॅग आहेत त्या खाली दिलेल्या आहेत.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment